कोसळलेल्या झाडाची बाईक बनली सेल्फी पॉइंट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहिसर येथील शहीद तुकाराम ओंबळे उद्यानात पालिकेच्या उद्यान विभागाने पावसाळय़ात उन्मळून पडलेल्या झाडापासून आकर्षक बाईक तयार केली आहे. या बाईकला लाइट आणि हॉर्न बसवण्यात आले आहेत. त्यामुळे  अनोखी बाईक पाहण्यासाठी बच्चेकंपनीसह मोठय़ांचीही गर्दी होत आहे. 

ही बाईक सध्या लहानथोरांसाठी सेल्फी पॉइंट बनली आहे. 15 हजार 313 चौरस मीटरवर पसरलेल्या या मनोरंजन मैदानात रोज 250 ते 300 पर्यटक भेट देतात. या सेल्फी पॉइंट निर्मितीकरिता आर उत्तर विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक जनार्दन माने यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विद्या सहाय्यक सुबोध ढोबळे, मुकादम प्रदीप गुरव, माळी मुरगन कोंडन, संदीप यादव, सुनील जाधव व घोडके यांनी मेहनत घेतल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.