
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा पथकातील पोलीस कर्मचारी वैभव कदम याने आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणात कदम यांच्यावर आरोप होते. करमुसे मारहाण प्रकरणात पोलिसी चौकशीच्या जाचाला कंटाळून कदम याने जीवन संपवल्याची पोलीस दलात दबक्या आवाजात चर्चा आहे.
वैभव कदम तळोजा येथे राहत होते. त्यांनी तळोजा – निळजे स्थानकादरम्यान रेल्वेखाली उडी घेत जीवन संपवले. कदम यांचे शव ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, आत्महत्येपूर्वी कदम यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस व्हायरल होत आहे.































































