तामिळनाडू: समाज सुधारक पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना, तणाव वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
periyar

सामना ऑनलाईन । चेन्नई

तामिळनाडूमध्ये समाज सुधारक पेरियार यांचा पुतळा अज्ञात समाजकंटकांकडून तोडण्यात आला आहे. पुदुक्कोट्टई जिल्ह्यातील अरंथंगीजवळ पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याचे कळताच परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी संपूर्ण विभाग सिल करून घेतला असून कर्फ्यू सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, या आधी देखील गेल्यावर्षी मार्च महिन्यात अशाच प्रकारे पेरियार यांचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न झाला होता.