
हिमाचल प्रदेशातील मनाली येथे ट्रेकिंगसाठी गेलेला केरळचा एक ट्रेकर बर्फात अडकला. अर्शद नरिक्कोट्टू मेचेरी असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण एकटाच ट्रेकिंगसाठी आला होता. ट्रेकिंग करताना अर्शदचे बूट बर्फात ओले झाले. त्यामुळे त्याला पुढे जाता येईना. बर्फात अडकल्याने त्याची प्रकृती बिघडली. त्याने 112 या हेल्पलाइनवर पोलिसांना फोन करून यासंबंधी माहिती दिली. तरुण अडकल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन ते तीन किलोमीटरवर डोंगरावर चढून बर्फात अडकलेल्या तरुणाला सुखरूप खाली आणले.
























































