प्रसिद्ध अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप, महिलेने मागितली 50 कोटींची नुकसान भरपाई

बॉलिवूडमध्ये काम केलेला प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेता अली झफर याच्यावर एका मेकअप आर्टिस्ट महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. लीना घानी असे त्या मेकअप आर्टिस्टचे नाव असून तिने ट्विटरवरून हे आरोप केले आहेत. तिच्याआधी पाकिस्तानातील एक प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री मीशा शफीने देखील त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता.

ali-zafar

लीना घानीने सिंध उच्च न्यायालयात अली विरोधात खटला दाखल करत त्याच्याकडून पन्नास कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे. ‘गेल्या अनेक वर्षांपासून अली झफर यांच्याकडून माझ्यावर अत्याचार होत आहे. त्यामुळे आता मी माझ्यासाठी लढायचे ठरवले आहे. त्यांनी मला कोर्टात जायला सांगितले त्यामुळे आता मी कोर्टातच त्यांच्याशी लढणार’, असे लीनाने ट्विट केले आहे.

अली झफर बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटात झळकला आहे. त्याने तेरे बिन लादेन, लंडन पॅरिस, मेरे ब्रदर की दुल्हन, डिअर झिंदगी या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये गायन देखील केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या