वाडिया रुग्णालयाच्या शिरपेचात ‘एएसीआय’चा मानाचा तुरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एएसीआय अर्थात अमेरिकन ऍक्रिडेशन कमिशन इंटरनॅशनलकडून बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेनला मान्यता मिळाली असून रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय एएसीआय मानांकनप्राप्त हे देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे. या निमित्ताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वाडिया रुग्णालयाच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांचा सत्कार करण्यात आला.

एएसीआयने 25 ते 27 ऑगस्ट या दरम्यान बाई जेरबाई वाडिया चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये अमेरिकन ऍक्रिडिटेशन कमिशनचे पहिले आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण पूर्ण केले. या मान्यतेमुळे रुग्णांना पूर्णवेळ उच्च दर्जाची सेवा आणि शुश्रूषा प्रदान करण्याच्या रुग्णालयाच्या प्रयत्नांचा यश मिळालेय. याबद्दल बोलताना रुग्णालयाच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, रुग्णास उत्तमोत्तम वैद्यकीय सेवा पुरविण्याचे आमचे मुख्य उद्दिष्टय़ आहे. आम्ही रुग्णांच्या सर्वच गरजांना प्राधान्य देतो आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कठोर परिश्रम घेतो. वाडिया रुग्णालयात रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन असून एएसीआयद्वारे सूचित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करते. आम्हाला या यशाचा अभिमान वाटतोय. या यशाचे संपूर्ण श्रेय आमच्या टीमला जाते.