
परळ येथील कामगार मैदानात 24 आणि 25 मे रोजी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना चषकाचे हे 12 वे वर्ष आहे. प्रथम पारितोषिक 50 हजार आणि चषक, दुसरे पारितोषिक 25 हजार आणि चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांना आकर्षक बक्षीस आणि चषक देण्यात येणार आहे. दरम्यान, भोईवाडा पोलीस विरुद्ध पत्रकार असा विशेष सामना खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेचे आयोजन युवासेना सहसचिव मुकेश कोळी यांनी केले आहे. स्पर्धेसाठी साई गणेश स्पोर्ट्स क्लब, परळचे विशेष सहकार्य लाभले आहे.





























































