आदित्य ठाकरे, रोहित पवार, अदिती तटकरे यांच्यासह सहा युवा आमदारांची मुलाखत

3582
aaditya-thackrey-rohit-pawa

नगर जिल्ह्यात मेधा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आमदार आदित्य ठाकरे, रोहित पवार, धीरज देशमुख अदिती तटकरे या युवा आमदारांची मुलखत संगीतकार अवधूत गुप्ते घेणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहे थोरात यांच्या हस्ते होणार आहे.

नगरच्या अमृतवाहिनीत मेधा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख,  ऋतुराज पाटील, झिशान सिद्दकी या सहा आमदारांच्या मुलाखती महाराष्ट्रातील आघाडीचा गायक व संगीतकार अवधूत गुप्ते घेणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या विश्‍वस्त शरयू देशमुख यांनी दिली.

अमृतवाहिनी मधील भव्य क्रिडा संकुलात व मेधा मैदानावर होत असलेल्या या युवा महोत्सवाचे जिल्ह्यातील व राज्यातील युवकांना मोठे आकर्षण ठरले आहे. विद्यार्थ्यांसाठी मोठे सांस्कृतीक व्यासपीठ असलेल्या या मेधा महोत्सवाचे उद्घाटन  16 जानेवारी  रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, एबीबी कंपनीचे अध्यक्ष गणेश कोठावदे,  विश्‍वस्त  सौ.शरयुताई देशमुख,युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. मुलाखातीच्या कार्यक्रमातून तरुणांना प्रेरणादायी राजकीय वाटचाल व युवकांचे राजकारणातील महत्त्व विषद केले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या