#CAB आसाममध्ये पुढील 24 तासासाठी इंटरनेट सेवा खंडित

472

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून हिंदुस्थानात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना हिंदुस्थानचे नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात गेल्या दोन दिवसांपासून आसाममध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे. त्यामुळे बुधवारी संध्याकाळ 7 पासून गुरुवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राज्यातील दहा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडित ठेवण्यात येणार आहे.

आसाममधील लखीमपूर, लिनसुकीया, धेमाजी, दिब्रूगढ, चारायदेओ, सिवासागर, जोहरत, गोलाघाट, कामरूप शहर आणि कामरूप जिल्हा येथे इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. तसेच गुवाहटीमध्ये बुधवार संध्याकाळपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गुवाहटीतील वातावरण नॉर्मल होत नाही तोपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे, असे पोलिसांनी सांगतिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या