
सामना ऑनलाईन। आष्टी
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून प्रतीक्षा असलेल्या वरूण राजाने अखेर शनिवारी रात्री तालुक्यात जोरदार हजेरी लावली. आष्टी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून १६ मी.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे शेतकरीही सुखावला आहे. काही ठिकाणी शनिवारी रात्री पावसाला सुरुवात झाली तर काही ठिकाणी पहाटे पाऊस झाला. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे भरले आहेत, नदी, नाले, खळखळू लागले आहेत. राजाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांमध्येही उत्साहाचे पहावयास मिळत होते. उकाड्यापासून नागरिकांना सुटका मिळाली आहे. रविवारी दिवसभर वातातावरण ढगाळ होते. तालुक्यात टाकळसिंग मंडळात सर्वाधिक पाऊस झाला तर पिंपळा मंडळात सर्वात कमी पाऊस झाल्याची नोद आहे.
असा झाला मंडळात पाऊस
आष्टी – 10 मी.मी.
कडा – 20 मी.मी.
टाकळसिंग– 55 मी.मी.
धामणगाव– 16 मी.मी.
धानोरा – 03 मी.मी.
पिंपळा – 1 मी.मी.
दौलावडगाव – 06 मी.मी.

































































