‘अभिजात’ मराठीसाठी कलाकार एकवटले, मुलुंडमध्ये आज विशेष कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी कलाकार एकवटले आहेत. मुलुंड येथे उद्या शुक्रवार, 18 फेब्रुवारी रोजी ‘अभिमान मराठी, अभिजात मराठी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कालिदास नाट्यगृहात सायंकाळी 7 वाजता होईल.

‘झी’ मराठीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अभिमान मराठी, अभिजात मराठी’ कार्यक्रमाचे दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले यांचे तर लेखन श्रीरंग गोडबोले आणि विघ्नेश जोशी यांनी केले आहे. संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे आहे. कार्यक्रमात स्पृहा जोशी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, हृषिकेश जोशी व चंद्रकांत काळे यांचे कविता वाचन आहे. तर हृषिकेश कामेरकर, केतकी भावे, धनश्री देशपांडे, मंगेश बोरगावकर, पृथ्वीराज माळी व चंद्रकांत काळे यांच्या सुमधुर गीतांचा आनंद घेता येईल. शुभंकर तावडे, धनश्री काडगावकर, मयूरेश पेम आणि केतकी पालव यांचा नृत्याविष्कार सादर होईल.