जेईई परीक्षेसाठी नोंदणीला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जेईई मेन 2027 च्या जानेवारी सत्रासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. पात्र उमेदवार 22 नोव्हेंबर 2026 पर्यंत नोंदणी करू शकतात. ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून पहिली परीक्षा जानेवारी तर दुसरी परीक्षा एप्रिल 2027 मध्ये घेतली जाणार आहे. नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना स्वतःचा किंवा त्यांच्या पालकांचा ई-मेल ऍड्रेस आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल. नोंदणीसाठीची सविस्तर माहिती वेबसाइट jeemain.nta.nic.in वर देण्यात आली आहे.