
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणातील दोघा संशयितांची पॉलीग्राफ (लाय डिटेक्टर) चाचणी करण्यास मुंबई सत्र न्यायालयाने परवानगी दिली. मात्र आरोपी अमरेंद्र मिश्रा याच्यावर ही चाचणी करण्याची सीबीआयची मागणी न्यायालयाने फेटाळली.
अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी 2024 रोजी मॉरिस नोऱहानो याने गोळ्या झाडून हत्या केली होती. मॉरिसने ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या ते पिस्तूल मॉरिसचा खासगी अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याचे होते. विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश अजित यादव यांच्यासमोर झालेल्या सुनावणीवेळी सीबीआयने कोर्टात एक अर्ज सादर केला त्यात त्यांनी नमूद केले की, अमरेंद्र मिश्रा, मेहुल पारेख आणि रायन गोरे या तिघांकडे अभिषेक घोसाळकर यांच्या 2024 मधील हत्येबाबत महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता असून, सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी पॉलीग्राफ चाचणी आवश्यक आहे.


























































