खानू येथे दोन कारमध्ये घडक, 9 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील पालीजवळील खानू येथे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन मोटारींची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही गाड्यांमधील 9 जण जखमी झाले आहेत़ शनिवार सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला.

मुंबईतील भांडूप येथील पांडूरंग नारायण गवस हे आपली तवेरा गाडी (क्र.एम एच 04 एफ 0405) घेऊन मुंबईहून कणकवलीकडे चालले होते. त्याचवेळी वेलीवाडी येथील जितेंद्र जयराम सपकाळ हे आपली बोलेरो पिकअप गाडी (क्र.एम. एच 08 डब्ल्यू 3918) घेऊन गोव्याहून मुंबईकंडे चालले होते. ते पुढे जात असलेल्या मॅझिको गाडी (क्र.एम. एच.06 बीजी 1944) या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी बोलेरोची समोरुन येणाऱ्या तवेराली जोरदार धडकं झाली. या अपघातात दोन्ही गाड्यांमधील 9 जण जखमी झाले. तिसरी गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला खोलगट भागात जाऊन थांबली होती.

जखमींची नावे –
लहू श्रीधर माने, वय 42, रा.मालाड, पूर्व मुंबई, विनायक मंगेश परब, वय 36, प्रभाकर सोमा पाताडे, वय 60, हेमंत परब, वय 40, विजय चंद्रकांत गायकवाड वय 31, तवेरा कारचालक चालकं पांडूरंग नारायण गवस, वय 40, सर्व रा.भांडूप, मुंबई़ बोलेरो पिकअपमधील जखमी पुढीलप्रमाणे आहेत़ चालकं जितेंद्र सकंपाळ, वय 33, रा., लांजा, नबिसाब हुसनी चिक्काळी, वय 40, मैनुदि्‌दन सैफन चिक्काळी वय 28, दोघे रा.लांजा.

दरम्यान, अपघातातील जखमींना स्थानिकं लोकांनी तातडीने गाड्यांमधून बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका व महाराष्ट्र शासनाचा रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सर्व जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.