
रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे ते पावस जाणार्या रस्त्यावरील उतारात दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात गुरुवारी मृत्यू झाला आहे. अपघाताची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुजा विजय शिवलकर (वय 48, रा.भाट्ये खोतवाडी, रत्नागिरी) मृत महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचा दीर व दुचाकी चालक अक्षय विजय शिवलकर यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.
मंगळवारी सकाळी अक्षय दुचाकीवरुन पुजा यांना सोबत घेऊन पावस ते मावळंगे असा प्रवास करत होता. त्यावेळी तेथील उतारात दुचाकी घसरल्याने पुजा दुचाकीवरुन रस्त्यावर कोसळल्या. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार कदम करत आहेत.





















































