कामथे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री घडला. तेजस बाळाराम गुरव (रा. कामथेखुर्द ) असे या मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

तेजस दुचाकीने लोटे येथील सुप्रिया केमिकल कंपनीतून कामावरून घरी येत असताना कामथे येथे आला असता एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.ही धडक एवढी जबरदस्त होती की, त्यात तेजसचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तेजसचा जागीच मृत्यू झाला होता. तेजसच्या मृत्यूने कामथे खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.