
ग्रेटर नोएडाच्या यमुना एक्सप्रेसवेवर शुक्रवारी भीषण अपघात घडला आहे. एका अज्ञात वाहनाने मागून व्हॅनला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन मुलं गंभीर जखमी झाली आहेत. मृतदेह शविवच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यमुना एक्सप्रेसवेवर शुक्रवारी रात्री 1 वाजता रबूपुरा ठाण्याअंतर्गत रिसरात नोएडाहून जेवर येथे येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मागून व्हॅनला जोरदार धडक दिली. या धडकेने व्हॅनचा ताबा सुटून ती पलटली. या व्हॅनमध्ये 8 प्रवासी होते, त्यापैकी 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिन मुलं गंभीर जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी कैलाश रुग्णालयात नेण्यात आले. तिन्ही मुलांची अवस्था गंभीर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅनमध्ये प्रवास करणारे सर्व प्रवाशी झारखंडला जात होते. ग्रेटर नोएडाहून जेवरला जाताना हा अपघात धाला. पोलिसांकडून मृतदेहाचा पंजनामा केला जात असून आवश्यक ती कारवाई केली जाईल. उपेंद्र बैठा (38), बिजेंग्र बैठा (36), कांती देवी (30), कुव ज्योती (12), सुरेश (45) अशी मृतांची नावे असून सूजर (16), आयुष (08), आर्यन (10) जखमींची नावे आहेत.
























































