
दिल्लीत अनेक माजी खासदारांनी आपले सरकारी बंगले सोडलेले नाही. आता पोलिसांच्या मदतीने त्यांना हुसकावून लावण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. आवास आणि शहरी कामकाज मंत्रालयाने आता कारवाईसाठी पोलिसांना पाचारण करण्यास सुरूवात केली आहे.
सरकारी आवास बेकायदेशीर पद्धतीने बाळगण्याच्या विरोधात प्रशासनाने मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार माजी खासदार हरी मांझी यांच्या नॉर्थ अव्हेन्युतील तीन घरे खाली करण्याची आदेश देण्यात आले आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जर माजी खासदारांनी दिलेल्या मुदतीत जर घर नाही खाली केले तर पोलिसांकडून जबरदस्तीने त घर खाली करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. आतापर्यंत 40 माजी खासदारांना वारंवार नोटीस देऊनही घर खाली करण्यात आलेले नाही.
मंत्रालयाने बेकायदेशीरपणे सरकारी आवास अतिक्रमण करण्याविरोधात 230 खासदारांवर कारवाई केली होती. नवीन कायद्यानंतर माजी खासदार कामेश्वर सिंह यांनी सरकारी बंगला सोडला. सिंह 1967 साली खासदार होते. आपले वय आणि आजारपणामुळे बंगला खाली करण्यास त्यांनी नकार दिला होता.


























































