
ओमायक्रोनमुळे पालिकेने विनामास्क फिरणाऱयांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला असून दररोज आठ ते नऊ हजार जणांविरोधात कारवाई करून दंड वसूल करण्यात येत आहे. याआधी प्रत्येक विभागात दररोज सुमारे 200 जणांवर कारवाई केली जायची, मात्र आता प्रत्येक प्रभागात 250 जणांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे दररोज 12 लाखांपर्यंत दंड वसूल होत आहे. कोरोनाकाळात विनामास्क कारवाईत 80 कोटी दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाला रोखण्यात मास्क वापरणे हा सर्वात सोपा उपाय असल्याचे सिद्ध झाल्यामुळे गेल्या वर्षी एप्रिलपासून पालिकेच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱयांविरोधात 200 रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. यामध्ये क्लीनअप मार्शल, पोलीस आणि रेल्वेमध्येही कारवाई सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून विनामास्क फिरणाऱया आठ ते नऊ हजार जणांवर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 40 लाख 32 हजार लोकांकडून 80 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, ओमायक्रोनसारखे व्हेरिएंट आल्याने कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला असताना नागरिक मास्क न वापरता फिरत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे 500 रुपयांचा दंड करण्याबाबतही प्रस्ताव विचाराधीन आहे.
डिसेंबरमध्ये अशी झाली कारवाई
- 1 डिसेंबर – 6910 – 1382000
- 2 डिसेंबर – 8249 – 1649800
- 3 डिसेंबर – 9410 – 1882000
- 4 डिसेंबर – 10623 – 2124600
- 5 डिसेंबर – 9280 – 1856000
- 6 डिसेंबर – 7347 – 1469400
- 7 डिसेंबर – 7965 – 1593000
- 8 डिसेंबर – 8404 – 1680800























































