अभिनेता राजकुमार रावला गंडा, पॅन कार्ड वापरून घेतलं कर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याला अज्ञात आरोपींनी गंडा घातल्याचं वृत्त आहे. त्याच्या पॅनकार्डचा वापर करून कर्ज घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे.

स्वतः राजकुमार याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. तो म्हणाला की, माझं पॅनकार्ड वापरून 2500 रुपयांचं कर्ज घेण्यात आलं आहे. या कर्जामुळे माझा सीबील स्कोर कमी झाला आहे, असं राजकुमारने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

त्याने क्रेडीट इन्फॉर्मेशन ब्युरोला टॅग करून या प्रकाराची माहिती दिली असून यावर कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे. राजकुमारपूर्वी अनेक सेलिब्रिटी अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडले आहेत.

काही काळापूर्वी सनी लिओनी हिच्यासोबतही असाच प्रकार घडला होता. तिनेही आपलं पॅनकार्ड वापरून 2000 रुपयांचं कर्ज घेतलं गेल्याचा आरोप केला होता.