प्रसिद्ध मराठी अभिनेता दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. जानेवारीमध्ये एका पाठोपाठ एक तीन सेलिब्रिटींनी लग्नाचा बार उडवून दिला होता. आता मार्च महिन्यातही प्रसिद्ध मराठी अभिनेता संग्राम समेळ (Sangram Samel) हा विवाहबंधनात अडकला आहे. संग्राम कोरिओग्राफर श्रद्धा फाटकसोबत विवाहबद्ध झाला आहे.

sangram-samel-1

संग्रामचे हे दुसरे लग्न आहे. संग्रामने इंस्टावर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. इचलकरंजी येथे या दोघांची विवाहसोहळा पार पडला. कोरोना परिस्थितीमुळे फक्त जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नगाठ बांधली.

संग्रामचे याआधी 2016 साली  रुंजी या मालिकेतील मुख्य अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्यासोबत लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या काही वर्षातच त्या दोघांचा घटस्फोट झाला व ते वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाचे कारण समजू शकलेले नाही.

संग्रामने मालिकांसोबत चित्रपटातही काम केलेले आहे. ‘पुढचं पाऊल’, ‘ललित 205’, ‘सुखांच्या सरींचे हे मन बावरे’ या त्याच्या मालिका गाजल्या. त्याने ‘विकी वेलिंगकर’, ‘स्वीटी सातारकर’, ‘ब्रेव हार्ट’ य़ा चित्रपटात तो झळकला होता. त्याने ‘एकच प्याला’ या नाटकामध्येही त्याने काम केले आहे.