
दिवंगत हॉलीवूड अभिनेत्री मर्लिन मन्रो हिच्या दुर्मिळ चित्राचा लिलाव होणार आहे. अँडी वॉरहॉल याने काढलेल्या या चित्राला 20 कोटी डॉलर्स एवढी किंमत अपेक्षित आहे. जर एवढी किंमत मिळाली तर हे 20 व्या शतकातील सर्वात महाग चित्र ठरणार आहे.
चित्रकार अँडी वॉरहॉलने मर्लिनची अनेक चित्रे काढली. 1964 साली अँडी वॉरहॉलने ‘शॉट सेज ब्ल्यू मर्लिन’ नावाने चित्र काढले होते. ते फार गाजले. त्यात त्याने मर्लिनला लाल गडद लिपस्टिक आणि निळ्या रंगाच्या आयशॅडोमध्ये दाखवले आहे. तिचे केस सोनेरी केले आहेत. या चित्राच्या लिलावातून मिळणारी रक्कम थॉमस अँड डोसीस अम्मान फाऊंडेशनला दिली जाणार आहे. त्यांनीच हे चित्र विक्रीसाठी दिले आहे.





























































