विजेची बचत करणारे पंखे स्वस्तात मिळणार, अदानी इलेक्ट्रीसिटीची ग्राहकांना ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजेच्या बचतीसाठी अदानी इलेक्ट्रीसिटीकडून उपनगरातील वीज ग्राहकांना फाइव्ह स्टार रेटिंग असलेले पंखे, रेफ्रिजरेटर 42 टक्क्यांपर्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे 4 हजार रुपये किंमत असलेला पंखा केवळ 2 हजार 284 रुपयांमध्ये ग्राहकांना मिळणार आहे.

अदानी इलेक्ट्रीसिटीकडून मुंबई उपनगरात वीज वितरण केले जात असून ग्राहकांनी जास्तीत जास्त विजेची बचत करावी म्हणून कंपनी प्रयत्नशील आहे. त्यानुसार फाइव्ह स्टार मानांकन असलेल्या पंख्याच्या खरेदीवर विक्री किमतीच्या तुलनेत 42 टक्क्यांपर्यंत सूट ग्राहकांना मिळविता येणार आहे. हे रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित होणारे 48-इंच सीलिंग पंखे पारंपरिक पंख्यांच्या तुलनेत 60 टक्के कमी वीज वापरतात. तसेच जुना रेफ्रिजरेटर देऊन नवीन रेफ्रिजरेटर घेतल्यास 47 टक्के सवलत मिळू शकणार आहे. इच्छुक ग्राहकांनी 19122वर संपर्क करावा, असे आवाहन अदानी इलेक्ट्रीसिटीने केले आहे.