
रत्नागिरी जिल्हापरिषद शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श शाळा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी पत्रकार परिषदेत आदर्श शाळा पुरस्कार विजेत्या 20 शाळांची नावे जाहिर केली.
शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी सांगितले की, आदर्श शाळा पुरस्कारासाठी 33 शाळांचे प्रस्ताव आले होते. निवड समितीने 33 शाळांमधून 20 शाळांची आदर्श पुरस्कारासाठी निवड केली. त्यामध्ये 9 कनिष्ठ शाळा आणि 9 वरिष्ठ शाळांचा समावेश आहे. दोन शाळांना विशेष पुरस्कार देण्यात आला आहे. आदर्श शाळा पुरस्कार विजेत्या शाळा पुढीलप्रमाणे-कनिष्ठ प्राथमिक शाळा- मंडणगड- जि.प.प्राथमिक शाळा लाटवण उर्दु, दापोली-जि.प.प्राथमिक शाळा देहेणे तळवटकरवाडी, खेड-जि.प.प्राथमिक शाळा शेरवली वरची,चिपळूण-जि.प.प्राथमिक शाळा कापरे वरची, गुहागर-जि.प.प्राथमिक शाळा वाडदई, संगमेश्वर-जि.प.प्राथमिक शाळा फुणगूस मराठी,रत्नागिरी-जि.प.प्राथमिक शाळा टिके कांबळेवाडी क्र.3,लांजा-जि.प.प्राथमिक शाळा पडवण क्र.1 राजापूर-जि.प.प्राथमिक शाळा मूर क्र.1, विशेष पुरस्कार- जि.प. प्राथमिक शाळा लांजा क्र.2 आगरगाव.
वरिष्ठ प्राथमिक शाळा-मंडणगड जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा अडखळ,दापोली-जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा कर्दे,खेड-जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा धवडे,चिपळूण- जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा निरबाडे क्र.1, गुहागर-जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा वरवेली क्र.2,संगमेश्वर-जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा डावखोल,रत्नागिरी-जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा चांदोर क्र.1,लांजा-जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा बापेरे,राजापूर-जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पाथर्डे विशेष पुरस्कार-जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा आंबेड बुद्रुक क्र.2 संगमेश्वर यांना जाहिर झाला.जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे मणचेकर यांनी सांगितले.यावेळी शिक्षणाधिकारी निशादेवी बंडगर,उपशिक्षणाधिकारी मुरकुटे उपस्थित होते.


























































