‘निर्बला’ सीतारामन; काँग्रेस नेत्याची टीका 

1117

कॉर्पोरेट करातील कपातीच्या मुद्द्यावर चर्चा करत असताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका करत त्यांना ‘निर्बला’ सीतारामन असे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संसदेत सोमवारी कॉर्पोरेट करातील कपातीच्या मुद्द्यावर चर्चा सुरु होती. यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी या मुद्द्यावर सरकारची बाजू मांडली. यानंतर या मुद्द्यावर बोलताना चौधरी म्हणाले की, ‘आम्ही तुमचा खूप आदर करतो. मात्र कधी-कधी तुम्हाला निर्मला सीतारामन म्हणण्या ऐवजी ‘निर्बला’ सीतारामन म्हणण्याचं मन होतं. तुम्ही मंत्रिपदावर तर आहात, मात्र तुमच्या मनात जे आहे, ते तुम्हाला बोलता येत नाही.’ असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, या वक्तव्याच्या एक दिवस आधीच अधीर रंजन चौधरी यांनी आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य केलं होत. ज्यावरून संसदेत गदारोळ माजला होता. एनआरसीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पंत्रप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना घुसखोर म्हटले होते. ते म्हणाले होते की, ‘हा देश सर्वांचा आहे. हा देश कुण्या एका व्यक्तीच्या मालकीचा नाही. इथे सर्वांना समान अधिकार आहे. मी तर म्हणेन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेही घुसखोर आहेत. तुमचं घर गुजरातमध्ये आहे आणि तुम्ही दिल्लीत आला आहात. तुम्ही स्वत: स्थलांतरीत आहात, वैध-अवैध या गोष्टी नंतर पाहू, असे चौधरी म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या