
सामना प्रतिनिधी । सोलापूर
शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ‘जनआशीर्वाद’ यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सोलापूर शहरातून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. सकाळी आदित्य ठाकरे यांचे उपस्थित शिवसैनिकांनी ‘जय भवानी जय शिवराय’च्या जयघोषात अभूतपूर्व स्वागत केले. यानंतर आदित्य ठाकरे यांनी वालचंद महाविद्यालयात तरुणांशी संवाद साधला आपल्या ठाकरी शैलीतील अभ्यासपूर्ण आणि रोखठोक वक्तव्यांनी त्यांनी तरुणाईची मने जिंकली सोलापुरातील स्थानिक प्रश्नापासून ते राज्याच्या विविध प्रश्नाबाबत अनेक प्रश्न आदित्य ठाकरे यांना उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिंनी विचारले. या सर्व प्रश्नांना त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तरे देत हजारो तरुणांची मने जिंकली आणि संवाद साधला. सोलापूरला चांगले क्रीडासंकुल असावे, विद्यार्थिनींना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात याच बरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी उद्योग यावेत, असे अनेक प्रश्न आदित्य संवादच्या निमित्ताने विचारण्यात आले या सर्व प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी समर्पक उत्तरे दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्यातील तरुणाईला भेडसावणारे प्रश्नही यानिमित्ताने विचारले गेले. आदित्य ठाकरे यांनी खास शैलीत उत्तर दिले तेव्हा उपस्थित विद्यार्थ्यांनी जल्लोष केला आणि तुमच्या सोबत आहोत असा निर्धार केला. यावेळी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत, सचिन आहेर खासदार निंबाळकर, पूर्वेश सरनाईक, सिद्धेश कदम यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.




























































