
राजकारणाच्या मैदानात नेहमीच तुफान फटकेबाजी करणारे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी अंधेरी पश्चिमेतील डी. एन. नगर येथील महात्मा फुले मैदानावरही क्रिकेट स्पर्धेनिमित्त जोरदार फटकेबाजी केली. त्यांच्या दमदार उपस्थितीमुळे खेळाडूंमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली.
युवासेना अंधेरी पश्चिम विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक 67 व 69 यांच्या वतीने अॅड. हृतिक मांजरेकर यांच्या पुढाकारातून आयोजित भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत त्यांनी मैदानात उतरून खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि युवा क्रीडाप्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण केले. यावेळी विभागप्रमुख व आमदार अॅड. अनिल परब, महिला विभाग संघटिका अनिता बागवे, विधानसभा संघटक संजय कदम, समन्वयक सुनील जैन खाबिया, संतोष परब, सरोज बिसुरे, महिला विधानसभा सहसंघटक ज्योत्स्ना दिघे, दीपक सणस तसेच युवासेनेचे प्रसाद झगडे, सिद्धेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
























































