बाबो! महिन्याभरापासून अपर सर्किट, ‘या’ शेअरने वर्षभरात 1 लाखाचे केले 45 लाख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर मार्केट सध्या विक्रमी स्तरावर असून अनेक कंपन्यांचे शेअर तुफान पळत आहेत, परंतु गुंतवणूकदारांचे सध्या लक्ष वेधून घेतले आहे ते बिहारच्या आदित्य व्हिजन (Aditya Vision) या कंपनीने. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची होलसेल विक्री करणाऱ्या या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या महिन्याभरापासून अपर सर्किट लागले आहे.

आदित्य व्हिजन कंपनीचा शेअर आजही 5 टक्के पळाला असून एका शेअरची किंमत सध्या 960.45 रुपये झाली आहे. गेल्या सहा महिन्यात हा शेअर 2410 टक्के तर वर्षभरात 4562 टक्के वाढला आहे. 8 जुलै 2020 रोजी या शेअरची किंमत 20.60 पैसे होती. याचाच अर्थ गेल्या वर्षी ज्या लोकांनी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील त्यांचे आता 45 लाख 62 हजार रुपये झाले असतील.

aditya-vision

छोट्या शहरांवर लक्ष केंद्रीत

आदित्य व्हिजनचे प्रबंध निर्देशक यशवर्धन सिन्ही यांनी कंपनीचा विस्तार करण्याची योजना असल्याचे म्हटले. चालू आर्थिक वर्षात झारखंडमध्ये 12ते 15 नवीन स्टोअर सुरू करण्याची आमची योजना आहे. यासह पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आसाममध्येही स्टोअर सुरू केले जातील.

943 टक्के प्रॉफिट

दरम्यान, कंपनीने पहिल्या तिमाहीचे (जानेवारी ते मार्च) आकडेही जारी केले आहेत. पहिल्या तिमाहीत कंपनीचा प्रॉफिट 943.03 टक्के वाढला असून तो 17.21 कोटींवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत कंपनीला फक्त 1.65 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. मात्र वर्षभरात कंपनीने मोठी झेप घेतली आहे.

IT मधील ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे केले 8 लाख, वर्षभरात 837 टक्के रिटर्न

1999 मध्ये सुरुवात

बिहारमधील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कंपनीचे स्टोअर असून दहा हजारांहून अधिक उत्पादनांची येथे विक्री होते. कंपनीची सुरुवात 1999 मध्ये झाली होती आणि 2016 मध्ये या कंपनीचा शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाला होता.