
उत्तर प्रदेश निवडणूकीत खेरागढ मतदारसंघातून 74 वर्षीय हसनुराम आंबेडकरी हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. आंबेडकरी हे यंदा त्यांची 94 वी निवडणूक लढवणार असून याआधीच्या 93 निवडणूका ते हरले आहेत.
‘मी शेतात मजूर म्हणून काम करतो माझ्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड आहे. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालतो. आतापर्यंत 93 निवडणूका लढवल्या आहेत’, असे आंबेडकरी सांगतात.
आंबेडकरी यांनी 1985 साली पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. आतापर्यंत त्यांनी लोकसभा, विधानसभा, पंचायत निवडणूका वेगवेगळ्या मतदारसंघातून लढवल्या आहेत. 1988 साली त्यांनी राष्ट्रपती पदासाठी देखील अर्ज केला होता मात्र तो फेटाळण्यात आला होता.



























































