सलाम! शस्त्रक्रियेनंतर रूग्णालयात उपचार घेणाऱ्या आजोबांनी केले मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सोमवारी राज्यातील 17 जागांसह देशात 71 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. मुंबईमध्ये के. नायर या 71 वर्षीय आजोबांनी रूग्णालयात उपचार घेत असतानाही मतदानाचा अधिकार बजावला. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असते हेच या आजोबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

के. नायर यांच्यावर गेल्या आठवड्यामध्ये मेंदूवरील अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर त्यांना ते अतिदक्षता विभागात होते. गेल्या तीन दिवसापासून त्यांना वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. तब्येतीत सुधारणा होत असतानाच त्यांनी मतदानाचा अधिकार बजावण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करत झेन मल्टिस्पेशालिटी रूग्णालयाने त्यासाठी पुढाकार घेतला आणि रूग्णवाहिकेसह त्यांना मतदानकक्षात दक्षतापुर्वक नेण्यात आले व अतिशय काळजीपूर्वक पुन्हा मतदानाचा अधिकार बजावून रूग्णालयात आणण्यात आले. नायर यांच्यासह त्यांच्याप्रमाणेच कांबळे व जेष्ठ नागरीक विनायक थत्ते यांनीही तब्येत बरी नसताना आपला अधिकार बजावला.