रविशंकर ‘गो बॅक’ ; पाटणा विमानतळावर निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

पाटणासाहिब मतदारसंघातून उमेदवारी मिळालेले भाजपच्या रविशंकर प्रसाद यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्या उमेदवारीवरून मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. रविशंकर प्रसाद विमानतळावर पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली. ‘रविशंकर गो बॅक’ अशी घोषणाबाजी केली.

यावेळी पक्षाचे राज्यसभा खासदार आर. के. सिंह यांच्या समर्थनार्थही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. चुकीच्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विमानतळावरच रविशंकर प्रसाद यांचे समर्थक आणि विरोधक कार्यकर्ते आपापसात भिडले. दरम्यान, पाटणासाहिब मतदारसंघातून शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांना तिकीट नाकारण्यात आले आहे.