मोदी सरकारने जनतेवर लादलेल्या इंधन दरवाढीचा युवक काँग्रेसकडून निषेध

मोदी सरकारने तत्काळ इंधन दरवाढ मागे घेत जनभावनेचा आदर करावा व जनतेची लूट थांबवावी,असे आवाहन करत उदगीरमध्ये युवक काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारने डिझेलवर 820 टक्के तर पेट्रोलवर 258 टक्के एक्साईज ड्यूटी लावून पेट्रोलचे दर 100 रुपये लिटर तर डिझेलचे दर 90 रुपये लिटरपर्यंत वाढवले आहेत.

दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. जनतेच्या खिशातील पैसे अन्यायकारक पद्धतीने लुटले जात आहेत. मोदी सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही, त्यांच्या बहिरेपणावर इलाज करणे गरजेचे आहे, असे मत लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विजय निटुरे यांनी व्यक्त केले. यावेळी उदगीर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मंजूरखा पठाण,उदगीर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल कांडगिरे,तालुका काँग्रेस कमिटी बुथ समन्वयक विजयकुमार चवळे,शहर काँग्रेस कमिटी बूथ समन्वयक अहमद सरवर,उदगीर विधानसभा काँग्रेस सोशल मिडिया अध्यक्ष अमोल घुमाडे,नगरसेवक महेबूब शेख आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या