लिंबू कोणी मारीला! अहिल्यानगरात ऐन निवडणुकीत जादूटोणा

अहिल्यानगर शहरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात असताना अहिल्यानगरमधील आनंद नगर परिसरात लिंबू-टोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरात एकच चर्चा रंगली आहे. मागील काही दिवसांपासून आनंदनगर परिसरात विविध ठिकाणी भारलेले लिंबू आढळून येत आहेत. हे नेमके कोण आणि कशासाठी करत आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असताना एका दुचाकीवरून एक पुरुष आणि महिलेने हे लिंबू टाकल्याचे दिसत आहे. या फुटेजची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.