एसटी–मोटरसायकल अपघातात चार तरुणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहिल्यानगर–कल्याण महामार्गावर डिंगोरे येथे जीवनदीप हॉटेलजवळ रविवारी सायंकाळी एसटी बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. यात मोटरसायकलवरील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. खंडू नारायण भले, शिवराम नारायण पारधी (रा. भलेवाडी), दीपक सखाराम भले आणि आशिष ढवळू भले (रा. मराडवाडी, डिंगोरे) अशी मृत तरुणांची नावे आहेत. एकाच गावातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. नागरिकांनी जखमींना ओतूर प्राथमिक आरोग्य पेंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तरुणांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.