महात्मा गांधी यांच्यावरील डॉक्युमेंट्री ठरली सर्वोत्कृष्ट, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल

नुकत्याच पार पडलेल्या 21व्या ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये महात्मा गांधी यांच्यावरील डॉक्युमेंट्रीने बाजी मारली आहे. ‘अहिंसा – गांधी – द पॉवर ऑफ द पॉवरलेस’ या लघुपटाने सर्वेत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार पटकावला आहे.

या लघुपटाची पटकथा-दिग्दर्शन रमेश शर्मा यांचे आहे. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्ताने त्यांनी या लघुपटाची निर्मिती केली होती. महात्मा गांधी त्यांची तत्त्वं, त्यांनी अहिंसेच्या मार्गाने केलेला सत्याग्रह आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व आजच्या तरुण पिढीला कळावे यासाठी हा लघुपट तयार करण्यात आला होता. सर्वेत्कृष्ट लघुपट या विभागात एकापेक्षा एक लघुपटांना नामांकन मिळाले होते. परंतु त्या सर्वांवर मात करत या लघुपटाने बाजी मारली आहे. पुरस्काराबाबत रमेश शर्मा यांनी आनंद व्यक्त केला असून हा पुरस्कार त्यांनी महात्मा गांधी यांना समर्पित केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या