हिवरेबाजार, राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीत बंडाचा झेंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातच नव्हे तर देशात नावाजलेल्या आदर्शगाव हिवरे बाजार व राळेगणसिद्धी ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱयांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. बिनविरोध निवडणुका घेणारी गावे म्हणून ख्याती असलेल्या दोन गावांतील लोकांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि हिवरे बाजारचे प्रवर्तक पोपटराव यांचा शब्द मोडीत काढत यावर्षी निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

हिवरे बाजारमध्ये तब्बल 30 वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक होत असून गावचे प्रवर्तक पोपटराव पवार यांना निवडणुकीला समोरे जावे लागणार आहे. एका खासगी संस्थेत शिक्षक म्हणून काम करणारे किशोर संबळे त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढविणार आहेत. राळेगणसिद्धीत बिनविरोध निवडणुकीची 35 वर्षांची परंपरा गेल्यावेळीपासून मोडीत निघाली आहे. यावर्षीही तेथे निवडणूक होत असून गावातील तरुण पिढीला निवडणूक हवी आहे. तेथे 9 पैकी 2 जागा बिनविरोध झाल्या असून अन्य सात जागांसाठी मतदान होणार आहे. बिनविरोध निवडणूक होणाऱया गावाला आमदार निधीतून 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी केली होती. त्यावेळी पहिला प्रतिसाद राळेगणसिद्धीतून आल्याचे सांगण्यात आले होते. स्वतः हजारे यांनी या योजनेचे काwतुक केलं होतं. मात्र गावातील तरुण पिढीला निवडणुका हव्या असून हजारे यांनी त्यास मान्यता दिल्याचं सांगण्यात येत आहे.

पवार विरोधकांची पोलीस संरक्षणाची मागणी

गावातील राजकीय विरोधकांकडून जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी पोपटराव पवार यांच्या विरोधातील पॅनलच्या उमेदवारांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

शिस्त विरुद्ध बेशिस्तीची लढाई

गावासाठी काम करताना काहींची नाराजी झाली असू शकते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली नाही. शिस्त विरुद्ध बेशिस्त अशी ही लढाई असून विकास कामे हवीत की बेशिस्तीची मुभा, याचा निर्णय आता मतदारांनी घ्यावा, असं पोपटराव पवार यांनी म्हटलं आहे.