नगर मनपा स्थायी सभापती, सभागृह नेतापदासाठी रस्सीखेच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनपा स्थायी समितीमधील आठ जागा रिक्त होऊन आठवडा झाला आहे. या निवडीसाठी अद्यापही महासभेचा अजेंडा काढलेला नाही. दरम्यान, स्थायी समितीत जाण्यासाठी इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. दुसरीकडे सभापती व सभागृह नेतापदासाठी सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू झाली आहे.

मनपाची निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे  कामकाजासाठी अवघा आठ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे अखेरच्या टर्ममध्ये स्थायी समितीत जाण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. मनपात महापौरपद शिवसेनेकडे, उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. तर, स्थायी समितीचे सभापतिपद राष्ट्रवादीकडे आहे.  स्थायी समिती सभापतिपदासाठी शिवसेनेकडून गणेश कवडे, तर राष्ट्रवादीकडून विनीत पाऊलबुद्धे यांची नावे चर्चेत आली आहेत.