
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत उदयपूरचे रहिवासी असलेल्या शुभ मोदी आणि शगुन मोदी या भावंडांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही लंडन फिरायला निघाले होते.
शुभ व शगुन हे उदयपूरचे मार्बल व्यावसायिक रचित मोदी यांची मुलं आहेत. शुभ व शगुन हे महिनाभरासाठी लंडन फिरायला निघाले होते.
या दोघांव्यतिरिक्त उदयपूर हून वर्दीचंद मेनारिया आणि प्रकाशचंद मेनारिया हे दोन भाऊ देखील लंडनला नोकरीसाठी जात होते. ते लंडनला हॉटेलमध्ये शेफचे काम करतात.