Air India एअर इंडियाची मॉस्को विमानसेवा बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाने युक्रेनवर सुरू ठेवलेल्या हल्ल्यांचा धसका घेत एअर इंडियाने मॉस्कोची विमान उड्डाणे रद्द केली आहेत. रशिया व आसपासच्या हवाई हद्दीत युद्ध कारवाया सुरूच आहेत. या युद्धाच्या काळात विमान प्रवासासाठी विमा संरक्षण देण्यास आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांनी नकार दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने गुरुवारी मॉस्कोची विमान उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला.

रशियाच्या हवाई हद्दीत ‘फ्लाईट इन्शुरन्स’ वैध ठरणार नसल्याची भीती एअर इंडियाच्या प्रशासनाला सतावत आहे. त्या अनुषंगाने मॉस्कोची विमानसेवा तूर्त बंद करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या सर्व उड्डाणांसाठी आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांकडून विमा संरक्षण पुरवण्यात येते.