
हिंदुस्थानने कश्मीर संदर्भातील कलम 370 हटवल्याने पाकिस्तानची जळफळाट सुरूच आहे. जगभरत पाकिस्तान मदतीची याचना करत आहे. पण कुणीही पाकिस्तानला अजून भीक घातलेली नाही म्हणून पाकिस्तान दहशतवाद्यांच्या माध्यमातून हिंदुस्थानविरोधात कारवाया करत आहे. पाक व्याप्त कश्मीरमध्ये 50 दहशतवादी लपले असून ते कश्मीरमध्ये हल्ल्याच्या तयारीत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड जकी उर रहमान लकवी हा पीओके मध्ये बसून कश्मीरमध्ये हल्ला करण्याचे नियोजन करत आहे. त्याच्या इशार्यावर 40-50 दहशतवादी हिंदुस्थानमध्ये घुसखोरीच्या तयारीत आहेत. या दहशतवाद्यांनी सहा ते सातच्या ग्रुपने सीमा पार करण्याचा प्लान केला आहे. या प्लानमध्ये पाकिस्तानचे सैन्य असून ते दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करत आहेत.
बालाकोटमध्ये हल्ल्यानंतर पाकव्याप्त कश्मीरमधील लॉन्च पॅड्सवरील दहशतवाद्यांना पळवण्यात आले होते. त्यांनी परत आपले बस्तान बसवले आहे. या दहशतवाद्यांची संख्या तब्बल 300 इतकी आहे. तसेच हिंदुस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात हत्यारे पोहोचवण्याचे षडयंत्रही दहशतवाद्यांनी रचले आहे.

























































