
उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये एका इमामच्या पत्नीने इमामाला दाढी ठेवण्यावरून इशारा दिला आहे. दाढी कापली नाही तर तलाक घेईल असा इशारा दिला आहे. महिलेचं म्हणणं आहे की, ती एका मॉडेलची मुलगी आहे, तिला क्लिन शेव्ह असलेला पती हवा आहे. दाढीवरून सुरू झालेल्या वादामुळे इमामाने आता एसएसपीकडे तक्रार केली आहे. तरी या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचलेल्या इमामाने सांगितलं की, ‘माझा निकाह जून 2020 मध्ये झाला. माझी पत्नी म्हणते की तू दाढी काप, कारण ती एका मॉडेलची मुलगी आहे. पण मी एका धार्मिक स्थळाचा इमाम असल्यानं असं करू शकत नाही. त्यामुळे मी तक्रार करण्यासाठी आलो आहे. माझी पत्नी मला प्रचंड त्रास देत आहे. मी त्रासलो आहे.’ आजतकने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
निकाह झाल्यापासून इमामाची पत्नी दाढी कापण्यासाठी मागे लागली आहे. जर दाढी कापली नाही तर तलाक घेईन असा इशारा तिने दिला आहे. वडिलांसोबतही वाद झाल्याचे म्हटले आहे. इमाम मोठ्या धर्मसंकाटात सापडले आहेत.





























































