इशिता रेवाळेची सुवर्णासह तिहेरी कमाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल हिंदुस्थानी आंतरविद्यापीठ जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत मुंबईच्या विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या जिम्नॅस्ट इशिता रेवाळे हिने दमदार कामगिरी करत एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह अखिल हिंदुस्थानी स्तरावर तृतीय क्रमांक पटकावत आपले व संकुलाचे नाव उज्ज्वल केले. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत इशिताने अनइव्हन बार्समध्ये सुवर्ण, तर सांघिक स्पर्धा आणि फ्लोअर एक्सरसाइजमध्ये रौप्य पदके जिंकत सर्वांचे लक्ष वेधले. आपल्या यशाबद्दल बोलताना ती म्हणाली, कठोर परिश्रम, शिस्त आणि प्रशिक्षक व कुटुंबीयांचा पाठिंबा यामुळेच हे यश मिळाले. मॅटवरील प्रत्येक क्षणाने मला अधिक मजबूत बनवले. अजून मोठा पल्ला गाठण्याचा निर्धार व्यक्त करत इशिताने भविष्यासाठी मोठे लक्ष्य ठेवले आहे.