
हिंदुस्थानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कथित विषप्रयोगाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. पाकिस्तानातील एका महिला पत्रकाराने केलेल्या दाव्यानुसार कराचीतील रूग्णालयात दाऊदवर उपचार सुरू आहेत. मात्र पाकिस्तानी सरकारने या वृत्ताल दुजोरा दिलेला नाही. त्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद अब्राहिमचा व्याही जावेद मियांदाद याला कुटुंबासहित नजरकैदेत ठेवण्यात आले असल्याचे वृत्त समोर आले होते. या वृत्ताचा आता स्वत: मियांदादने खुलासा केला आहे.
जावेद मियांदाद हा दाऊदचा व्याही आहे. 2005 मध्ये दाऊदच्या मुलीचे व मियांदादच्या मुलाचे लग्न झाले होते. दाऊदवरील विषप्रयोगावर मियांदाद बोलणे टाळले. तसेच त्याच्या कुटुंबाला नजरकैदेत ठेवण्यात आले असल्याच्या वृत्ताचे त्यांने खंडण करत, दाऊदविषयीची माहिती केवळ पाकिस्तान सरकारचं देईल, असे स्पष्ट केले.
— Arzoo Kazmi|आरज़ू काज़मी | آرزو کاظمی | 🇵🇰✒️🖋🕊 (@Arzookazmi30) December 17, 2023
पाकिस्तानी महिला पत्रकार आरजू काझमीने केलेल्या दाव्यानुसार दाऊद इब्राहिमवर अज्ञातांकडून विषप्रयोग करण्यात आला. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर असून त्याला कराचीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पाकिस्तानात याबाबत कुणी भाष्य केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे काझमीने म्हटले आहे. मियांदादने दिलेल्या स्पष्टीकरणावरून दाऊदवर झालेल्या विषप्रयोगाची माहिती काही अंशी खरी असल्याची चर्चा सुरू आहे.

























































