आज युती युती करणारे भाजपने युती तोडली तेव्हा कुठे होते? संजय राऊत यांचा खडा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात युतीसंदर्भात चर्चा झाल्याच्या पुडय़ा आता काही जण सोडत आहेत, मात्र 2014 मध्ये दगाबाजी करून भाजपने शिवसेनेबरोबरची अनेक वर्षांची युती तोडली तेव्हा ही युती युती करणारी मंडळी कुठे होती, असा खडा सवाल शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज उपस्थित केला.

फुटीर खासदार राहुल शेवाळे यांनी मोदी व उद्धव ठाकरे यांच्या भेटीत युतीची चर्चा झाली होती, असा दावा केला होता. त्याचा खरपूस समाचार खासदार राऊत यांनी घेतला.

आज जे लोक युती युती करतायत, पंतप्रधानांच्या भेटीसंदर्भात गौप्यस्फोट करतायत ते लोक 2014 मध्ये कुठे गेले होते? तेव्हा विधानसभेला युती कुणी तोडली, असा प्रतिसवाल खासदार संजय राऊत यांनी केला.

युती तुटण्यास शिवसेना नव्हे तर भाजप जबाबदार आहे. भाजपने शब्द फिरवला नसता तर एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री झाले असते. शिंदे यांची खरी फसवणूक भाजपनेच केली, असा टोलाही त्यांनी लगावला.