अॅल्युमिनियम फॉईल वापरताय? पुरुषांना होऊ शकतो ‘हा’ त्रास!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकदा पदार्थ गरम राहण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईल वापरली जाते. विशेषतः पोळ्या, पराठे यांना तर हमखास वापरली जाते. वर्तमान पत्राला पर्याय म्हणून ही फॉईल लोकप्रिय असली तरीही याचेही दुष्परिणाम आहेत.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या एका संशोधनानुसार, या फॉईलचा अतिवापर शरीरासाठी नुकसानदायक ठरतो. गरम जेवण कोमट झाल्यानंतर काही काळ ते फॉईलमध्ये गुंडाळून ठेवायला काही हरकत नाही. पण, प्रत्येक अन्नाचं स्वतःचं शेल्फ लाईफ असतं. म्हणजेच, त्याचा ताजा आणि पौष्टिक राहण्याचा एक ठरलेला कालावधी असतो.

तो कालावधी उलटूनही तर अन्नपदार्थ अॅल्युमिनियम फॉईलमध्ये राहिले तर त्यांच्यातील तेल आणि मसाल्यांटी अॅल्युमिनियमसोबत प्रतिक्रिया होते. त्यामुळे ते अन्न खाणाऱ्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो.

याचा सर्वाधिक दुष्परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. फॉईलमध्ये गुंडाळलेलं अन्न खाल्ल्याने प्रजनन क्षमता घटू लागते. त्यामुळे त्यांना मूल जन्माला घालण्यासाठी अडथळे येऊ शकतात.

फॉईलमुळे अल्झायमर आणि डिमेन्शिया असे आजार जडू शकतात. तसंच किडनीचे त्रासही भेडसावतात. काहींना याच्या सतत वापरामुळे श्वसनाचे विकारही जडू शकतात. सगळ्यात मुख्य म्हणजे अॅल्युमिनियम फॉईलमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.