समाजवादी नाही तर नमाजवादी पक्ष, अमर सिंग यांची टीका  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

निवडणूक जिंकल्यावर विष्णूचे मंदिर उभारू असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केले होते. त्यावर टीका करत राज्यसभेचे खासदार अमर सिंग म्हणाले की अखिलेश यादव हे समाजवादी नाही तर नमाजवादी आहेत.  एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान त्यांनी ही टीका केली आहे.

अमर सिंग यांच्या मुली तरुण झाल्या असून त्यांच्यावर ऍसिड फेकले पाहिजे असे वक्त्यव्य आझम खान यांनी केले होते. त्यावर शांत प्रतिक्रिया देताना सिंग यांनी खान यांच्या खासदार पत्नी आणि आमदार मुलगा सुखी रहावे अशा शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आझम खान सारखे लोक असल्याने अखिलेश यादव हे समाजवादी नाही तर नमाजवादी पक्षाचे अध्यक्ष असल्याची टीका त्यांनी केली आहे.

तसेच “अखिलेश यादव यांचे कौटुंबिक कलह आपण सोडवले पण जेव्हा मी अडचणीत होतो तेव्हा अखिलेश यादव यांना माझ्याकडे पाहायलाही वेळ नव्हता” असे सिंग यांनी नमूद केले. धर्मनिरपेक्षतेसाठी आपल्या स्वाभिमानाशी प्रतारणा करत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यसभेच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी अमर सिंग यांची प्रशंसा केली होती, तेव्हापासून सिंग यांनी समजावदी पक्षावर टीका करण्यास सुरूवात केली. त्यापूर्वी सिंग यांनी मुजफ़्फ़रनगरमध्ये झालेल्या दंगलीवरूनही अखिलेश यादव यांना  धारेवर धरले होते.