
शनिवारी रात्रीपर्यंत आलेल्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 107 झाली असून आज आलेल्या वेगवेगळया अहवालात 88 नवे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आता 4422 झाली आहे.
रात्री आलेल्या अहवालानुसार, 4 जण कोरोनामुळे दगावले आहे. यात 40 वर्षीय महिलेसह, 3 इसमांचा मृत्यू झाला आहे. यात 48 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुण, 74 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज आलेल्या दोन वेगवेगळया अहवालात सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागातून आढळून आले आहे. दर्यापूर तालुक्यात 17 कोरोना बाधित आढळून आले.
या व्यतिरिक्त चांदूर बाजार येथील 4, भातकुली, परतवाडा, यावली शहीद, वडगांव माहुरे सह इतर ठिकाणी सुध्दा 10 रुग्ण आढळून आले आहे. सध्या जिल्हयात ग्रामीण भागातच कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हयात कोरोना बाधितांचा आकडा 4422 झाला आहे.


























































