
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदूचे श्रद्धास्थान असलेली अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा कट पाकिस्तानी दहशतवाद्यांनी रचल्याचे समोर आले आहे. या हल्लल्ल्यात आयएसआयचा हात असल्याचे समजते. लष्कराच्या जवानांना यात्रेच्या मार्गावर एक पाकिस्तानी बनावटीची स्नायपर रायफल सापडली आहे. ही रायफल सापडल्यानंतर सरकारने अमरनाथ यात्रा 15 ऑगस्टपर्यंत रोखण्यात आली आहे. तसेच यात्रेसाठी कश्मीरात आलेल्या भाविकांनी लवकरात लवकर कश्मीर सोडण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
J&K govt issues security advisory in the interest of #AmarnathYatra pilgrims and tourists, “that they may curtail their stay in the Valley immediately and take necessary measures to return as soon as possible”, keeping in view the latest intelligence inputs of terror threats. pic.twitter.com/CzCk6FnMQ6
— ANI (@ANI) August 2, 2019
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेत पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. ‘गेल्या काही दिवसात लष्कराने वेगवेगळ्या भागात केलेल्या शोध कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यात पाकिस्तानी बनावटीची स्नायपर रायफल व पाकिस्तानी लष्कराचे भुसुरुंग बॉम्ब सापडले आहेत’ असे लेफ्टनंट जनरल केजेएस धिल्लोन यांनी सांगितले.
लष्कराच्या पत्रकार परिषदेनंतर जम्मू कश्मीरच्या राज्यपालांनी पत्रक प्रसिद्ध करत अमरनाथ यात्रा स्थगित करत असल्याचे जाहीर केले. ‘गुप्तचर यंत्रणांनी अमरनाथ हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे खोऱ्यातील परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात येत आहे. तसेच जे भाविक कश्मीर खोऱ्यात आले आहेत. त्यांनी तत्काळ जसे जमेल तसे परतावे’ असे राज्यपालांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.






















































