
Amazon ने Apple Days ची घोषणा केली आहे. Apple Days मध्ये लेटेस्ट iPhone 12 सीरीज, iPhone 11 आणि अन्य काही अॅपल प्रोडक्ट्सवर ऑफर्स दिल्या जात आहेत. Apple Days सेल 17 जुलै पर्यंत चालणार आहे. त्यामुळे तुम्हाला अॅपलचे प्रोडक्ट खरेदी करायचे असल्यास ही चांगली संधी आहे.
अॅमेझॉनच्या Apple Days मध्ये iPhone 12 हा 70,900 रुपयात उपलब्ध आहे. त्यावर 9000 हजार रुपयांचं डिस्काउंट आहे. त्याशिवाय HDFC Bank क्रेडिट कार्ड ट्रांझॅक्शनने दुसरे प्रोडक्ट खरेदी केल्यास ज्यादा 6000 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे.
तसेच अॅपल iPad Mini, MacBook Pro आणि दुसऱ्या प्रोडक्ट्सवर देखील डिस्काउंट दिला जात आहे. Amazon India च्या वेबसाईटनुसार तुम्ही अॅपलचे प्रोडक्ट्स सर्च करत असाल तर Apple Days मध्ये शॉपिंग करणं जास्त फायदेशीर ठरेल. कारण त्यामध्ये iPhone, iPad, MacBook आणि Apple Watch वर मोठी सूट देण्यात येत आहे.
अॅमेझॉनकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की अॅपलच्या रिवोल्युशनरी स्मार्टफोन मॉडल्सवर अॅक्टिव्ह डिल्स मिळतील. युझर्सना यामध्ये iPhone Xs Max ते iPhone 6s पर्यंतचे प्रोडक्ट बऱ्याच कमी किमतीत खरेदी करता येतील.
डिस्काउंटसह नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ ग्राहक घेऊ शकणार आहेत.




























































