रिलायन्स-फ्युचर ग्रुप भागीदारी विरोधात ऍमेझॉन आता सर्वोच्च न्यायालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऍमेझॉन आणि फ्युचर ग्रुप यांच्यातील वाद भविष्यात आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपमध्ये झालेल्या सुमारे 24 हजार 713 कोटी रुपयांच्या कराराला आव्हान देण्यासाठी ऍमेझॉनने आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

ऑक्टोबर महिन्यात लवादाने ऍमेझॉनच्या बाजूने निकाल देत फ्युचर ग्रुपला कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण किंवा विक्रीस तसेच निधी उभारण्यासाठी शेअर्स जारी करण्यावर बंदी घातली होती. यापूर्वी दिल्लीच्या न्यायालयाने देखील ऍमेझॉनच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र सोमवारी खंडपीठाने आधीच्या न्यायाधीशांचा निर्णय रद्द करत ऍमेझॉनला झटका दिला आहे. त्यामुळे कंपनी आता त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

ऍमेझॉनने 2019 मध्ये फ्यूचर कूपनमध्ये 49 टक्के भागिदारीसाठी दोन हजार कोटी रुपयांचा व्यवहार केला होता. यावेळी केलेल्या करारामध्ये फ्यूचरला दुसऱया कोणत्याही कंपनीसोबत करार करण्यापूर्वी ऍमेझॉनला माहिती देणे आवश्यक आहे, असे म्हटले होते. परंतु, फ्यूचरने कोणतीही कल्पना न देता रिलायन्ससोबत करार केल्याचे ऍमेझॉनचे म्हणणे आहे.